जातीवाचक शिवीगाळ केले प्रकरणी आरोपी प्रविन लाढाणेस ३ वर्षेची शिक्षा व ७ हजार रुपये दंड..

दिनांक २३ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

आरोपी नामे १) प्रविन रंगनाथ लाढाणे २) किरण रंगनाथ लाढाणे ३) दत्तु नामदेव लाढाणे ४) सुलाबाई रंगनाथ लाढाणे सर्व रा. डिकसळ ता. कर्जत, जि. अहमदनगर यास जातीवाचक शिवीगाळ केले प्रकरणी श्रीगोंदा येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. एस. शेख साहेब यांनी आरोपी नं. १) प्रविन रंगनाथ लाढाणे यास अनुसुचीत जाती जमाती कायदा कलम 3(1)(r) (s) नुसार ३ वर्षे शिक्षा व २०००/- दंड, तसेच ५०६ अन्वेय ६ महिने व २०००/- दंड, तसेच आरोपी नं. १ ते ३ यांना ३२३ अन्वये दोषी धरुन ३ महिने साधी कैद व प्रत्येकी १०००/- दंडाची शिक्षा सुनावली. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकिल सौ. संगिता अनिल ढगे, श्री. ए. डी. ढगे. सौ. पुष्पा कापसे (गायके) व के. जी. केसकर यांनी पाहिले.

घटनेची थोडक्यात हकीगत की, दिनांक ११/०३/२०१९ रोजी सुमारे ०४:१५ वाजता फिर्यादी हा गट नं. २८७ व २८८ च्या गटाच्या मध्ये असणारे शासकीय जागेत शासकीय विहिरीचे खोदकाम ठेकेदार हरीदास मांढरे यांनी आणलेले फोकलेन मशिनने करणार होते. सदरचे मशिन फिर्यादी व जे.सी. बी. ऑप्रेटर रस्त्यावरुन उतरवत असताना आरोपी नं. १ ते ४ सदर ठिकाणी धावत आले व त्यातील आरोपी नं. १ प्रवीन लाढाणे हा म्हणाला की, या विहीर या ठिकाणी खोदायची नाही, तु कुठला ढाण्या वाघ म्हणत जातीवाचक शिवीगाळ करुन, तुझ्या पाठीमागे कोण आहे कोण..?  तेथे आले तर बघतो, तुला जिवे मारतोच तुझ्याबरोबर इतरांनाही ठोकुन काढतो असे म्हणाला.

तसेच आरोपी नं. १ ते ३ यांनी फिर्यादीस लाथा बुक्याने मारहाण केले त्यानंतर आरोपी सदर ठिकाणाहुन निघुन गेले. त्या नंतर फिर्यादीने कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. १४९/२०१९ भादवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ अ.जा.ज कायदा कलम 3(1) (r) (s) प्रमाणे आरोपी नं. १) प्रविण रंगनाथ लाढाणे २) किरण रंगनाथ लाढाणे ३) दत्तु नामदेव लाढाणे ४) सुलाबाई रंगनाथ लाढाणे याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हाचा तपास पुर्ण झाले नंतर एस.डी.पी. ओ. श्री. संजय सातव, कर्जत यांनी मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा न्यायाधीश, श्रीगोंदा श्री. मुजीब. एस. शेख साहेब, यांच्या न्यायालयात झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, स्वतंत्र साक्षीदार, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील सौ. संगिता ढगे, अनिल ढगे, पुष्पा कापसे(गायके) व के. जि. केसकर यांनी काम पाहिले. मा. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकील पुष्पा कापसे (गायके) यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन, मा. न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी आशा खामकर, यांनी सहकार्य केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading