मुंबई-गोवा महामार्गावर लुटमार करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा.. श्रीगोंद्यातील एकाचा समावेश…

दिनांक १८ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा/राजापूर:

मे महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी परिसरात पिस्तूलसारखा दिसणारा लाईटर वापरून नागरिकांना धमकावत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना राजापूरच्या प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी अजय घेडगे (श्रीगोंदा) आणि दीपक श्रीमंदिलकर (शिरूर) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचाही या गुन्ह्यात समावेश होता. घटना १८ मे रोजी ओणी-अणुस्कुरा मार्गावर घडली होती.

आरोपींनी पुणे आणि संगमेश्वर येथून दुचाक्या चोरून गोव्यात पिस्तूलसारखा लाईटर खरेदी केला आणि राजापूरकडे परतताना त्यांनी वाहनांना धमकावण्याचा प्रयत्न केला.

एका वाहन चालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील अंगठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अणुस्कुरा घाटात नाकाबंदी केली, परंतु आरोपी पसार झाले होते. पुढील तपासानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि न्यायालयाने त्यांना दोन वर्षांचा कारावास सुनावला आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading