श्रीगोंद्यातील अजय कोथिंबीरे यास.. जातीवाचक शिविगाळ प्रकरणी सक्त मजुरीची शिक्षा..

दिनांक ७ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

आरोपी नामे अजय भाऊसाहेब कोथिंबीरे, वय ३० वर्षे, रा. शिवाजी नगर, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यास छेडछाड तसेच जातीवाचक शिवीगाळ केले प्रकरणी श्रीगोंदा येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. एस. शेख साहेब यांनी भा.द.वि. ३५४ (d)(१) अन्वये आरोपीस दोन वर्षे सक्त मजुरी तसेच २०००/- दंड ५०४ अन्वये एक वर्षे सक्त मजुरी तसेच १०००/- दंड, तसेच ५०६ अन्वये एक वर्षे सक्त मजुरी तसेच १०००/- दंड तसेच अनुसुचीत जाती जमाती कायदा कलम ३(१)(r)(s), अन्वये दोषी धरुन ३ वर्षे सक्त मजुरी व ५०००/- दंडाची शिक्षा सुनावली. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकिल सौ. संगिता अनिल ढगे, श्री. ए. डी. ढगे, सौ. पुष्पा कापसे(गायके) यांनी पाहिले.

घटनेची थोडक्यात हकीगत की, पिडीत फिर्यादी ही तिच्या आई- वडिलासोबत श्रीगोंदा येथे राहावयास होती. तसेच ती कला शाखेत शिक्षण घेत होती. वरिल आरोपी हा ती कॉलेजला जात असतांना तिचा पाठलाख करुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तु माझे सोबल लग्न कर असे म्हणत होता. सदर फिर्यादी ही आरोपीस नकार देत होती. वरिल आरोपी हा म्हणत होता की, तु दुस-या सोबत लग्न केल्यास मी तुझे लग्नामध्ये आडथळा आणीन. तसेच आरोपी हा फिर्यादी बरोबर वाद घालुन तिस व साक्षीदार यास जातीवाचक शिवीगाळ करत असे.

त्याबाबत सन २०१६ मध्ये पिडीत हिने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरुन भादवि कलम ३५४ (d) ५०४, ५०६ अ.जा.ज कायदा कलम ३(१) (r) (s) प्रमाणे आरोपी नामे अजय भाऊसाहेब कोथिंबीरे याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हाचा तपास पूर्ण झाले नंतर एस.डी.पी.ओ.श्री.सुदर्शन मुंढे, कर्जत यांनी मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा.जिल्हा न्यायाधीश, श्रीगोंदा श्री. मुजीब. एस.शेख साहेब, यांच्या न्यायालयात झाली.

सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, स्वतंत्र साक्षीदार, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील सौ. संगिता अनिल ढगे, श्री. ए. डी. ढगे, सौ. पुष्पा कापसे(गायके) यांनी काम पाहिले. मा. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकील पुषा कापसे (गायके) यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मा. न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी संतोष सुधाकर फलके, यांनी सहकार्य केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading