आ. सत्यजितदादा तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीगोंदा तालुक्यामध्ये सात विद्यालयांना संगणक संचाचे वाटप..

दिनांक १६ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजितदादा तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीगोंदा तालुक्यामध्ये एकूण सात विद्यालयांना संगणक संचाचे वाटप व श्रीगोंदा शहरातील चार विद्यालयांना वाटर प्युरिफायर संच ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री स्मितल भैया वाबळे हे होते. सदर, प्रसंगी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री बंडू मखरे, शिक्षक संघटनेचे नेते श्री हरिचंद्र नलगे, श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भीमराव आनंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शिक्षक संघटनेचे श्री उद्धव गायकवाड प्राचार्य बंडू मखरे, श्री हरिश्चंद्र नलगे, श्रीगोंदा तालुक्याचे समन्वयक श्री राजीव कुमार साळवे हे उपस्थित होते. मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांचा उल्लेख करून, सोडवण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी मुख्याध्यापक भिभिषण परकाळे, मुख्याध्यापक बाळासाहेब जठार मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, मुख्याध्यापक श्री दिलीप भुजबळ, मुख्याध्यापक रसाळ, माध्यमिक शिक्षक सोसायटी चेअरमन श्री दिलीप काटे, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब चिखलठाणे व विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र गारुडकर यांनी केले व आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भीमराव आनंदकर सर यांनी व्यक्त केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading