श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये महिला व बालकल्याण समितीच्या वतीने एकल महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये वाटप.: सौ संगीता मखरे,(सभापती महिला व बालकल्याण)..

दिनांक १६ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगरपालिकेच्या वतीने सन २०२३/२४ या आर्थिक वर्षाकरिता महिला व बाल कल्याण विभागामार्फत वैयक्तिक लाभाकरिता दिला जाणारा निधी १३५ लाभार्थी महिलांना देण्यात आला.  याप्रसंगी सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. याबाबत नगरसेविका सौ संगीता मखरे,(सभापती महिला व बालकल्याण) यांनी प्रसिद्धीसाठी माहिती दिली.

नगराध्यक्षा सौ शुभांगी ताई पोटे, उपनगराध्यक्ष ज्योती खेडकर व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता सतिश मखरे, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या हस्ते या निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 

सतीश मखरे,  नगरसेविका सीमाताई गोरे, सोनाली घोडके, मनीषा लांडे, दिपाली औटी, छाया गोरे, सुनीता खेतमाळीस, मनीषा वाळके, वनिता क्षीरसागर व सर्व नगरसेवक व लाभार्थी येथे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading