दिनांक १६ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
नुकत्याच श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय (ज्ञानदीप) श्रीगोंदा येथे पार पडलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मुलांच्या मोठ्या गटात सिद्धार्थनगर जिल्हा परिषद शाळा अव्वल आली असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. मांडवगन गटातील बांगर्डे येथील संघाबरोबर अंतिम सामना खेळत सिद्धार्थनगर शाळेने प्रथम क्रमांक मिळविला.
या शाळेत इयत्ता ७ वी पर्यंतचे वर्ग असून प्रथमच जिल्हा पातळीवर जाण्याची संधी या शाळेस मिळत आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तसेच नगरसेवक संग्राम घोडके, सोनाली हृदय घोडके, निशुभाई बेपारी, रावसाहेब घोडके, जीवाजी घोडके, नंदकुमार ससाणे, आनंद घोडके, श्रीकांत घोडके, अनिल ससाणे, सुरेश भागचंद घोडके, गोरख घोडके, अविनाश घोडके, विशाल घोडके, दीपक घोडके, शशिकांत घोडके, भाऊसाहेब घोडके, सचिन वायदंडे यासह गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, केंद्रप्रमुख माणिक आढाव यांनी यशस्वी विदयार्थी तसेच शाळेचे मुख्याध्यापक संदीप मोटे, शिक्षक संतोष सोनवणे, शारदा शेळके, सागर काराळे, मंगल मोटे यांचे अभिनंदन केले.
यावेळी पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पेढे भरवत व फटाक्यांची आताशबाजी करत वाजतगाजत स्वागत केले. नव्यानेच विकसित होत असलेल्या या शाळेने केंद्र व बिटस्तरीय विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवल्याने परिसरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
