केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत खोमणेमळा शाळेचे नेत्रदिपक यश..

दिनांक १७ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:        

पारगाव येथे झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत खोमणेमळा, घारगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच लांब उडी स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी कुणाल खंडेराव खोमणे याने प्रथम क्रमांक पटकावला. उंच उडी स्पर्धेत देखील शाळेचा विद्यार्थी कुणाल खंडेराव खोमणे याचाच प्रथम क्रमांक आला. 

जाहिरात

स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख हनुमंत भुकन व केंद्र मुख्याध्यापक भगवान लगड यांच्या हस्ते करण्यात आले. पंच म्हणून रावसाहेब मेहेत्रे, जनार्दन कन्हेरकर, शहाजी वागस्कर, राजेंद्र माने, शिवलिंग शिरसागर, काळे मॅडम, जरांडे मॅडम जगताप मॅडम व भोर मॅडम यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व समालोचन शशिकांत मांगडे यांनी केले.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, सिताराम भुजबळ साहेब, वेताळ साहेब, गांगड साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग खोमणे व सर्व पालकांनी कौतुक केले. मुख्याध्यापक बापूराव खामकर, सहशिक्षिका अनिता कांबळे/माने यांनी विद्यार्थ्यांचा चांगला सराव करून घेतला. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading