दिनांक १६ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील शेडगाव येथील रहिवाशी राजेंद्र आनंदराव भोसले यांचा ट्रॅक्टर चालवताना तोल जाऊन पडल्याने कल्टीव्हेटरमध्ये अटकुन दुर्दैवी मृत्यु झाला आहे. यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी तालुक्यातील शेडगाव येथील राजेंद्र भोसले हे कल्टीव्हेटरऔजाराने शेतातील मशागत करीत असताना, त्यांचा तोल जाऊन ते ट्रॅक्टरच्या मागे पडले. तसेच रेस केलेला ट्रॅक्टर विना चालक पुढे चालु लागला आणि भोसले हे थेट ट्रॅक्टरच्या मागे जोडलेल्या कल्टीव्हेटरच्या दातांमध्ये अटकले. ट्रॅक्टरने त्यांना काही अंतरावर ओढत नेले. तर, पुढें असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन ट्रॅक्टर थांबला. मात्र, ओढत आणलेल्या भोसलेंना फिरत असणाऱ्या चाकांनी जमीनीत गाडलं.. आणि त्यांचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यु झाला. खबर देण्यास विलंब झाल्याने मयताचे नातेवाईकांनी घटनेबाबत संशय व्यक्त केला. परंतु, तपासात काही संशयित आढळले नसल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
या घटनेची खबर मयताचा भाऊ विक्रम भोसले यांनी पोलिसांना दिली. त्यानूसार आमृक ची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शिंदे करीत आहेत.
स्रोत:(मिळालेली माहिती)
