शेडगाव गावासाठी मा.अशोकराव चोपडा यांनी दिले ११० वृक्ष..

दिनांक १ ऑगस्ट,शेडगाव/श्रीगोंदा:

दिनांक ३१ जुलै रोजी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव गावासाठी पुणे येथील आधार स्थंभ या स्वयंसेवा संस्थेचे मा. अशोकराव चोपडा यांच्यामार्फत ११० वृक्ष रोपणासाठी दिले असून, यातून ग्रामस्थ पर्यावरण पूरक उपक्रम राबवत आहेत.

ग्रामस्थांमार्फत गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात वृक्षारोपण आणि संवर्धन अविरतपणे राबवण्यात येत आहे. अगदी उन्हाळ्यात देखील झाडांना पाणी देऊन जगवण्यात येते. यात शेडगाव ग्रामस्त संगोपनाची जबाबदारी घेऊन दिलेले वृक्ष लागवड करणार आहेत. वृक्ष लागवड हि भावी पिढीसाठी लाभदायी होणार असून, यात शेडगाव गाव हिरवेगार करण्याचा संकल्प आहे. या कामासाठी शेडगाव गावच्या युवकांचा पुढाकार आणि सहभाग करून घेऊन, १०,००० वृक्ष लावून गाव हिरवेगार करणार असल्याचे विद्यमान सरपंच विजय शेंडे यांनी संकल्प व्यक्त केला .

शेडगाव ग्रामस्थानी आता “झाडे लावा झाडे जगवा ” असा ध्यास घेतल्याचे दिसून येत आहे. या वृक्ष लागवडीतून पर्यावरणाचा ऱ्हास थांबणार असून, संवर्धन होणार आहे . याप्रसंगी गावाचे विद्यमान सरपंच विजय शेंडे, ग्रामशेवक प्रशांत देवतसे, गोरे ताई आणि शेडगाव ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्तित होते.

(स्रोत:अनिल दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading