दिनांक २८ मे(शेडगाव, श्रीगोंदा):
तालुक्यातील शेडगाव येथील रहिवासी झुंबर अंकुश जाधव यांच्या पत्नी राधा झुंबर जाधव (वय २७ वर्षे) यांनी दिनांक २७ मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मयताचा पती झुंबर याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनला अकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत.

सविस्तर असे की, शेडगाव गावातील झुंबर जाधव यांच्या पत्नी राधा जाधव यांनी काल रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. राहत्या घरामध्ये दोरीने गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली. पोलीस तपासामध्ये त्यांच्या हातावर ब्लेडचे वार असल्याचेही निदर्शनास आले आहे. नमूद प्रकार घरगुती वादातून झालेल्या जाचामुळे झाला असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर राधा जाधव यांचे पती, सासु, दिर व भावजय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास चालू आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गावडे एम. आर., किरण जाधव व सपोनि पाटील तपास करत आहेत. मयताचे शवविच्छेदन झाले असून, अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 27-year-old-married-woman-commits-suicide-by-strangulation
स्रोत:(खबर)
