दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ श्रीगोंदा:
दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी पंजाब येथे झालेल्या साउथ वेस्ट झोन विभागीय आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची व इंटरनॅशनल कुस्ती संकुलाची खेळाडू सिद्धी अनिल होळकर ७८ kg प्लस वजन गटांमध्ये हिने प्रेक्षणीय ज्यूदो खेळत गोल्ड मेडल मिळवले. व तिची (ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी) आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल दादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संजय अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षण रत्नाकर झिटे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना शा. शि. संचालिका बागुल कल्पना, क्रीडा शिक्षक संजय डफळ व श्री. अनिल होळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
