श्रीगोंद्यात होणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी १०० एकरात लाखोंचा जनसमुदाय राहणार उपस्थित.. २०० पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांसह १००० स्वयंसेवक कार्यरत..! २०० जेसीबीच्या सह्यायाने पाटलांवर पुष्पवृष्टी.. सकल मराठा समाजासह बहुजन बांधवांना उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन..

दिनांक ८ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

सकल मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी सबंध महाराष्ट्रभर आंदोलनं, सभा, उपोषनाच्या माध्यमांतून आपली आणि मराठा समाजाची भुमिका मांडणारे मनोज जरांगे पाटिल यांची जाहीर सभा श्रीगोंदा शहरालगत असणाऱ्या औटी वाडी येथील मैदानावर होणारं असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे. जरांगे यांच्या सभेची तारीख निश्चित झाल्यापासून संपुर्ण तालुक्यात सदरील सभेत उपस्थिती बाबत बहुजन बांधवांसह सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी शहरातील औटी वाडी येथील १०० एकर क्षेत्रावर लाखों समाज बांधवांच्या उपस्थितीत संध्याकाळी ८:०० वाजता मनोजदादा जरांगे पाटलांची सभा होणारं आहे. यासाठी तालुक्यासह परिसरातील व पंचक्रोशितील लाखों समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. यावेळी पाटलांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा २०० जेसीबी उभा करीत त्यातुन पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सुमारे २०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला असुन, १००० हून जास्त स्वयंसेवक याठीकाणी कार्यरत असणार आहेत. या सभेस महिला व तरुणांची संख्या लक्षणीय राहणार आहे. सभा शांततापूर्ण वातावरणात पार पडणार असुन, सभेस कसलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल. असे आयोजकांनी नमूद केले आहे.

मराठा समाजाच्या सर्व आमदारांनी या बिलाबाबत सकारात्मक भुमिका घ्यावी.. जेणेकरून अद्यादेश पारित होण्यास गती मिळेल.. तसेच, नमूद मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व मागण्यांची पूर्तता: होऊन समाजाला न्याय मिळावा व सदरील आंदोलन लवकरात लवकर यशस्वी व्हावे.. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading