दिनांक ८ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील रायगव्हाण येथे रमाई भीमराव आंबेडकर जयंती मोठया आनंदात साजरी करण्यात आली. रमाई ने शेण गवऱ्या विकून मुलांचा संभाळ केला. पण, बाबासाहेबाना कधी आपले दुःख सांगितले नाही. रमाईच्या त्यागा मुळेच बाबासाहेबांना शिक्षण घेता आले. असे अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

यावेळी वंचित चे श्रीगोंदा तालुकाअध्यक्ष संतोष जौजाळ, अनिल पठारे (भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश सघंटना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष), आबा जाधव, श्रीकांत जाधव, सागर बोरगे, आकाश गायकवाड, बापू गायकवाड, अरविंद जाधव, सतीष पठारे, पोपट पठारे, निखिल गायकवाड, अविनाश गायकवाड, सागर गायकवाड, सोन्या गायकवाड आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी कुकडी कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पठारे होते. तर, सूत्र संचालन अरुण पठारे यांनी केले. आभार संतोष पठारे यांनी मानले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
