दिनांक ७ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील काष्टी येथील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सन २०२४ – २९ पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थेच्या चेअरमनपदी श्री.नागवडे आदेश भुजंगराव यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. शितोळे विलास धोंडीबा यांची संस्था कार्यालयात काल बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
काल दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या काष्टी येथील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे मार्गदर्शक नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र (दादा) नागवडे व संस्थेचे संस्थापक श्री. नागवडे दिपकशेठ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू पंचवार्षिक निवडणुकी बिनविरोध पार पडली. तसेच, श्रीगोंदा सहाय्यक निबंधक श्री.थोरात अभिमन्यु यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या काष्टी येथील कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलविली असता चेअरमनपदी श्री. नागवडे आदेश भुजंगराव यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. शितोळे विलास धोंडीबा यांची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याने संस्थेच्या सभासदांनी आनंद व्यक्त केला.
संस्थेने आज अखेर ऑडीट वर्ग “ अ ” ठेवून २९ कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार केला असून, संस्था लवकरच नव्याने बेलवंडी आणि विसापूर या २ शाखा चालू करण्याचा मानस असल्याचे नुतन चेअरमन श्री नागवडे आदेश यांनी सांगितले.
या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक निवडीनंतर नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र (दादा) नागवडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
निवडून आलेले खालील संचालक मंडळ सूर्यवंशी अमोल आबासाहेब, खराडे विजय लक्ष्मण, काटे हनुमंत बापूराव, नागवडे तुषार रोहिदास, सुपेकर पंढरीनाथ मारुती, तावरे महेश मोहन, शिंदे भाऊसाहेब दत्तात्रय, चोरमले शिवाजी ज्ञानदेव, उदमले अजिनाथ तुकाराम, शिर्के कोमल प्रविण, नागवडे सोनाली विश्वास, श्रीराम आपासाहेब गणपत भोर बाळासाहेब नामदेव, लहू पांडुरंग हिरडे पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. याकार्याक्रमाचे सूत्रसंचालन संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी दातीर संतोष रावसाहेब यांनी केले. तर, उपस्थित सभासदांचे आभार श्रीगोंदा शाखाधिकारी महामुनी तेजस रत्नाकर यांनी मानले.
‘‘ संस्था स्थापनेपासून संस्था आणि सभासदांचे हित हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पारदर्शकपणे अविरत कार्य सुरू असून भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून संस्था अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू – चेअरमन नागवडे आदेश भुजंगराव ’’
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
