दिनांक १८ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलिसांनी दोन गंभीर गुन्हयातील पाहीजे आरोपींना अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे रोहन भगवान भोस (वय २४) आणि त्याचा भाऊ वैभव भगवान भोस (वय २२) यांना अटक केली.
माहितीनुसार, रोहन भोस हा श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये नोंद भादंवि कलम ३३२(क), १८९(२), १९०, ८७ अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात पाहीजे होता.
पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सो, उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री. विवेकानंद वाखारे सो, कर्जत विभाग व पोलीस निरीक्षक श्री. किरण शिंदे सो यांचे सुचना/ मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपींचा शोध घेतला. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, रोहन भोस हा शिरुर तालुक्यातील रांजगणगाव येथे येणार असल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली.
तपासादरम्यान, रोहन भोसच्या भाऊ.. वैभव भोसचा सहभाग असल्याचे समोर आले. वैभवला श्रीगोंदा परिसरातून अटक करण्यात आली. रोहन भोसवर यापूर्वी श्रीगोंदा पो.स्टे.त भादंवि कलम ८७, ११५(२), ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे आणि पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर करीत आहेत.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)





जाहिरात…
