श्रीगोंदा शहराचे नामांतर संत शेख महंमद बाबा यांच्या नावाने ‘श्री संत महंमद नगर’ करण्याची नागरिकांची मागणी..

दिनांक, १८ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुका आणि जिल्ह्यातील विविध धर्मीय नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत शेख महंमद बाबा यांच्या नावावरून श्रीगोंदा शहराचे नामकरण करण्याची भावनिक मागणी शहरातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. संत शेख महंमद बाबा यांच्या कार्याचे मोठेपण आणि त्यांचे शांततेचे प्रतीक म्हणून असलेले स्थान यामुळे ही मागणी अधिक तीव्रतेने चर्चिली जात आहे.

संत शेख महंमद महाराज/बाबा हे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरु असून, त्यांचे कार्य आणि कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात परिचित आहे. दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात त्यांच्या पुतळ्याला स्थान मिळाले आहे, हे त्यांच्या महत्त्वाचे प्रतीक आहे. त्यांच्या दर्ग्याचे शांततेचे प्रतीक म्हणून सर्वत्र आदराने स्मरण केले जाते. संत शेख महंमद बाबा यांनी ऐक्याचे आणि शांततेचे संदेश दिले आहेत, त्यामुळे त्यांची लोकप्रियता प्रत्येक धर्मातील लोकांमध्ये आहे.

विद्यमान सरकारने विविध जिल्ह्यांना आणि शासकीय इमारतींना संत आणि महामानवांची नावे दिली आहेत. या अनुषंगाने, श्रीगोंदा तालुक्याला संत शेख महंमद बाबा/महाराज यांचे नाव देऊन, त्याचे नामकरण ‘श्री संत महंमद नगर’ करण्यात यावे, अशी मागणी विविध समाज घटकांमधून केली जात आहे. या मागणीला समर्थन देत, श्रीगोंदा तालुक्याच्या नागरिकांनी भावनिक एकता आणि शांततेचा संदेश शासनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.

(स्रोत: अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply