दिनांक १७ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा, अहिल्यानगर:
श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथे एका व्यापाऱ्याकडून तांदूळ लिलावाच्या व्यवहारात ९० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाच आरोपी.. नाव पत्ता-१)सतीष अरुण हिरडे रा.म्हातारपिंप्री ता. श्रीगोंदा २) अतुल कोठारी रा.पारगाव सुद्रीक ता श्रीगोंदा ३)सुनिल मुनेात (पुर्ण नाव माहित नाही) रा श्रीगोंदा ता श्रीगोंदा ४)तात्याराम झराड (पुर्ण नाव माहित नाही) रा.बेलवंडी कोठार ता श्रीगोंदा ५) टिळक भोस रा.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा या आरोपींविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून जप्त केलेल्या धान्याचा लिलाव झाला होता, त्यात फिर्यादी अजित लाटे यांनी सर्वाधिक बोली लावून तांदूळ खरेदी केला.
त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी सतीष हिरडे, जो तालुक्याच्या रेशनिंग संघटनेचा अध्यक्ष आहे, त्याने फिर्यादीला ९० हजार रुपये देण्याची मागणी केली आणि धमकी दिली की, पैसे न दिल्यास तांदूळ घेऊन जाऊ देणार नाही. तसेच, आरोपीने धमकी दिली की पैसे न दिल्यास त्याला जीवंत सोडले जाणार नाही. फिर्यादीने आरोपीला पैसे दिल्यानंतरही त्याला गाडी भरताना व बाहेर जाताना धमक्या देण्यात आल्या.
दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:१५ वाजता मढेवडगाव येथे हा प्रकार घडला. तसेच, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ३:३० वाजेनेच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील शासकीय धान्य गोदामावर आणखी एक प्रकार घडला. आरोपी अतुल कोठारी आणि इतर तिघांनी अजित लाटे यांना गाडी भरताना धमकावले. आरोपी टिळक भोस याने १.५ लक्ष रुपये खंडणीची मागणी केली.
फिर्यादीने या सर्व प्रकाराबाबत १६ ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्या गुन्हानुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(५), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपास अधिकारी सपोनि प्रभाकर निकम या प्रकरणाचा तपास करत आहेत. खंडणी आणि धमकीच्या या प्रकरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)





