येवती गावावर शोककळा..! माय लेकराचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू ..

दिनांक २२ एप्रिल २०२४, ढवळगाव, श्रीगोंदा:

तालुक्यातील येवती या गावामध्ये शेतकरी कुटुंबातील कु.नवनाथ बाजीराव आढाव वय २६ वर्षे व मीनाबाई बाजीराव आढाव वय ५० वर्षे हे दोघं आई व मुलगा पावसाचे वातावरण झाले म्हणून, शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले असता, पाऊस आल्यामुळे झाडाच्या आडोशाला थांबल्यानंतर त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

वीज एवढी भयंकर पडली होती की, त्या ठिकाणी लिंबाचे झाड भुईसपट झाले. मोठा आवाज आल्यामुळे शेजारील असणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष गेले व त्यांनी त्या जागी जाऊन पाहिले असता मीनाबाई बाजीराव आढाव व त्यांचा मुलगा कु.नवनाथ बाजीराव आढाव हे जागीच मृत्यू झालेले त्यांना दिसून आले.

त्यांचे मृतदेह श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी आनण्यात आला. यानंतर अंत्यविधी होणार आहे.  या नैसर्गिक आपत्तीत घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्रोत:(पत्रकार अमोल बोरगे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading