दिनांक १३ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
भाजपा-शिंदे महायुती सरकारने २०२४ विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व महिलांना लाडकी बहिण योजनेतून २१०० रुपये सरसकट देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच श्रावणबाळ, ज्येष्ठ नागरिक योजनांसारख्या पूर्वीच्या योजनांचे थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही.
या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयात उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक व महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, महिलांना सरसकट २१०० रुपयांचा लाभ, तसेच रखडलेले अनुदान तातडीने जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सरकार जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी रघुनाथ सूर्यवंशी, संभाजी घोडके, जनाबाई गायकवाड, शिवाजी समदडे, जमील भाई शेख, योगेश भुतकर, सुशांत भंडारी, रावसाहेब डांगे, निलेश साळुंके, हरिभाऊ काळे, रोहिदास मस्के, नितीन लोखंडे, संतोष चिकलठाणे, शरद नागवडे, नूतन पानसरे, गणेश लाटे, ओमकार शिंदे, राजू तोरडे, सुदाम सावंत, सुनील शिंदे, शहाजी बोरुडे, भाऊ मस्के, मयूर गोरे सह शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
