परिक्रमा शैक्षणिक संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅकचे A मानांकन प्राप्त ..

दिनांक २२ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

काष्टी-येथील परिक्रमा शैक्षणिक संकुल यामध्ये परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयास नुकत्याच झालेल्या मूल्यांकनामध्ये मानांकन प्राप्त झाले आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.
उच्च दर्जाचे शैक्षणिक वातावरण, निसर्गरम्य परिसर, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत लॅबोरेटरीज, तज्ञ शिक्षक वर्ग या सर्वांचे नॅक भेटीमध्ये मूल्यांकन करण्यात आले. नॅकच्या पहिल्याच भेटीमध्ये A श्रेणी प्राप्त करणारे ग्रामीण भागातील परिक्रमा हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.

परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर, कॉम्प्युटर इंजीनियरिंग या विभागांचे नॅक मार्फत मूल्यांकन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ग्रामीण भागातील परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयाने मिळवलेल्या या मानांकनाबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व दर्जेदार सोयी सुविधा परिक्रमाच्या माध्यमातून दिल्या जातात त्याचबरोबर उत्तम निकालाची परंपरा व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटरच्या माध्यमातून होणाऱ्या प्लेसमेंट या सर्वांचे मूल्यांकन यावेळेस नॅक ने केले.

परिक्रमाच्या या यशाबद्दल माजी मंत्री बबनराव पाचपुते, संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर प्रतिभा पाचपुते, संस्थेचे सचिव विक्रम सिंह पाचपुते, ॲकॅडमीक डायरेक्टर इंद्रायणी पाचपुते यांनी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी  यांचे अभिनंदन केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading