दिनांक २२ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवार आणि निवडणुकी संदर्भात नियोजन या विषयी बैठकीचे आयोजन श्रीगोंद्यातील बालाजी मंगलकार्यालयात करण्यात आले होते.
यावेळी वंचितचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. लोकसभेचा उमेदवार हा ओबीची असेल असे त्यांनी सांगितले. बाळासाहेब हे बुद्धिमान आणि विद्वान नेतृत्व आहे. त्यामुळे आज सर्व जाती धर्माच्या माणसाला त्यांनी उमेदवारी दिली आहे. वंचित समाजाला न्याय हवा असेल तर, त्यांनी वंचित बहुजन आघाडीलाच मतदान केले पाहिजे. आता ही जबाबदारी वंचित समाजातील प्रत्येक तरुणाने घेतली पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी वंचितचे भटक्या आघाडीचे राज्याचे नेते डॉ. ॲड. अरुण जाधव राज्य उपाध्यक्ष संतोष गलांडे, जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, तालुकाध्यक्ष संतोष जौजाळ, तालुका सचिव प्रमोद उजागरे, आबासाहेब रामफळे, प्रशांत पाटोळे, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख आदि सह युवकचे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, युवक उपाध्यक्ष सचिन घोडके, भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष आंनद घोडके, भीमराव घोडके, चंपालाल घोडके, नितीन जावळे, अरुण पठारे, नरसिंग भोसले, संविधान प्रचारक रावसाहेब घोडके, गणेश सांगळे, नाना सांगळे, मिलिंद शिंदे आदि सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
