जिल्हा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता अचानक उमेदवार दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक..

दिनांक २६ एप्रिल २०२४, अहमदनगर:

काल लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी ओबीसी आघाडीच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिल्याने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तीव्र नाराज होत आक्रमक झाल्याचं दिसले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याची तयारी केली होती. पण, राज्य कार्यकारणी पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर साहेबांना चुकीची माहिती सांगून, ओबीसी आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. या बाबत जिल्हा कार्यकारणी, युवा आघाडी, महीला आघाडी, तालुका कार्यकारणी, युवा आघाडी तालुका कार्यकारणी, कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याने जिल्ह्यांतील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले की, जे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष वाढवतात यांना विश्वासात न घेता वरिष्ठ नेत्यांनी असे निर्णय घेऊ नये या निर्णयाला विरोध म्हणून, जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वरिष्ठ पदाधिकारी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जिल्ह्यांतील सर्व पदाधिकारी संभ्रमात आहेत. सोलापूरची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी जिह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर प्रतिक बारसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तरी देखिल येत्या २ दिवसांत श्रध्देेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करुन, त्यांच्या आदेशाचे पालन केले जाईलअसे त्यांनी नमुद केले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष गलांडे, जिल्हा महासचिव शनेश्वर पवार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत नेटके, चंद्रकांत डोलारे, जिल्हा प्रवक्ते दादा समुद्र, कर्जत तालुका अध्यक्ष पोपट शेटे, पारनेर तालुका अध्यक्ष गणीभाई इनामदार, नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे, जिल्हा संघटक जिवन कांबळे, युवा आघाडी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, शहर महासचिव अमर निरभवणे, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन घोडके, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, मनोहर जिंदम, कर्जत शहर अध्यक्ष राहूल पोळ, जेऊर ग्रा सदस्य योगेश पाटोळे, किरण पाटोळे, नाना सांगळे, भीमा भाऊ घोडके, नितीनजी जावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्त्रोत:(निलेश गायकवाड, वंचित जिल्हा पदाधिकारी)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading