महापुरुषांच्या विचारांचा जागर: म्हसे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी..

दिनांक १६ मे २०२५,ढवळगाव (ता. श्रीगोंदा) :

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची संयुक्त जयंती म्हसे (ता. श्रीगोंदा) येथे मोठ्या उत्साहात आणि सामूहिक सहभागातून साजरी करण्यात आली. सायंकाळी या थोर महापुरुषांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये गावातील सर्व बहुजन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

मिरवणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी इंद्रभान खेडकर होते. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेलवंडी गावचे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या वेळी दादा मोहरे, रामदास भोसले, बाळासाहेब पठारे, गोरख भालेकर, लक्ष्मण देवीकर, बाबासाहेब पोपळे, सरपंच सुवर्णाताई फाजगे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव महेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सभेनंतर तात्या महाराज जौंजाळ यांनी सर्व उपस्थितांसाठी अन्नदानाचे आयोजन केले होते. तसेच, भाऊसाहेब देवीकर यांच्या सौजन्याने रात्रीच्या मिरवणुकीसाठी डीजेची खास व्यवस्था करण्यात आली. यानंतर प्रसिद्ध गायिका सुनीताराणी यांचा सुमधुर भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला, ज्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जौंजाळ, संग्राम जौंजाळ सर, तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भिवाजी जौंजाळ, उपाध्यक्ष गणेश फाजगे, खजिनदार बाबुराव शिंदे, शरद जौंजाळ, संघटक सागर शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

मंडळाचे जेष्ठ सल्लागार संभाजी फाजगे, विजय जौंजाळ, दयाराम जौंजाळ, आबा फाजगे, तसेच नियोजन समितीचे सदस्य रोहित जाधव, रवींद्र जौंजाळ, सुनील फाजगे, प्रकाश जौंजाळ, भगवान भालेराव, अक्षय फाजगे, रवींद्र कांबळे, विशाल शिंदे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जयंतीत विचारमंचावर उपस्थित मान्यवर ..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading