दिनांक ४ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील बोरी आणि रायगव्हाण येथे दिनांक ३ ऑक्टोबर २१ रविवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रतीक बारशे, युवक जिल्हाध्यक्ष संतोष जठार तालुका अध्यक्ष संतोष जौंजाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

शेखर हिवाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रदिप हिवाळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीगोंदा मंडळ अधिकारी श्री.जनार्दन सदाफुले यांची अध्यक्षीय निवड करण्यात आली.
चंद्रकांत थोरात, जयेश थोरात, सुभाष सोनवणे, संभाजी वाळुंज, काका सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. मारुती कोळपे, प्रशांत थोरात यांनी मोलाचे सहकार्य केले. Inauguration of Bori and Raigavan branches of Deprived Bahujan Aghadi.
फटाक्यांच्या आतषबाजीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शाखा अध्यक्ष राजेंद्र आसावले तर, उपाध्यक्ष राहुल उच्छे यांची निवड करण्यात आली आणि त्यांनी मनोगत वक्त केले.
(जिल्हाध्यक्ष) प्रतीक बारसे, (युवक जिल्हाध्यक्ष) संतोष जठार, (जिल्हा सचिव) योगेश साठे, (जिल्हा उपाध्यक्ष) संतोष गलांडे, (तालुका अध्यक्ष) संतोष जौंजाळ या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारसरणी, भविष्याची गुरुकिल्ली, पक्ष संगठन ईत्यादी विषयांवर प्रकाश टाकला. उपस्थितांना नाष्टा दिला आणि अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी दोन्ही गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे (जिल्हाध्यक्ष) प्रतीक बारसे, (महासचिव) योगेश साठे, (जिल्हा युवक अध्यक्ष) संतोष जठार, (श्रीगोंदा तालुका अध्यक्ष) संतोष जौंजाळ सह राजापूरचे सरपंच संतोष शिंदे, बोरी गावचे माजी उपसरपंच जयेश थोरात, पिसोरे गावचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र थोरात, येळपणे गावचे ग्रामपंचायत सदस्य आढाव तसेच, येळपणे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत नितनवरे, ढोरजा येथील प्रमोद उजागरे, चिंबळा येथील किरण उबाळे, संभाजी फाजगे, अक्षय फाजगे, विजय जौंजाळ, सागर शिंदे, लोणी येथील संतोष भोसले आदीसह परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(संतोष जौंजाळ)
