आंबेडकर घराण्याला शासकीय आमंत्रण देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी..

दिनांक १० फेब्रुवारी २०२५, अहिल्यानगर:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास आंबेडकर घराण्याला शासकीय आमंत्रण देण्यात यावे, यासाठी वंचित बहुजन आघाडीने आमदार संग्राम जगताप यांना निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात हनिफ शेख, अमर निरभवने, प्रवीण ओरे, जे.डी. शिरसाठ, ॲड. योगेश गुंजाळ, राजीव भिंगारदिवे आदी सहभागी होते.

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथील हॉटेल राजयोगमध्ये पुतळा समितीची बैठक झाली. या बैठकीत २० मार्च ते १ एप्रिल दरम्यान अनावरण सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोहळ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा. खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर, मा. भीमराव आंबेडकर, मा. आनंदराज आंबेडकर यांना शासकीय आमंत्रण देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी पुतळा अनावरण सोहळ्यास बौद्ध धम्म भंते संघाचेही आमंत्रण देण्याचे ठरवण्यात आले. हा सोहळा ऐतिहासिक बनून संविधानाच्या मूल्यांचे प्रतीक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading