दिनांक ७ सप्टेंबर, श्रीगोंदा:
दिनांक २ सप्टेंबर २१ रोजी नांदेड जिल्हातील कंधार तालुका कार्यक्षेत्रातील गऊळ या गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पोलीस प्रशासनाने संगनमत करून, जबरदस्तीने काढला. तसेच, नमूद ठिकाणच्या मातंग बांधवांवर लाठीचार्ज केला. या दोन्ही घटना निंदनीय असून, मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत.
या घटनांसह जिल्हा परिषद सदस्य बाबुराव गिरे व सामान्य माणसांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा श्रीगोंदयात वंचित बहुजन आघाडीच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनास निवेदन देत निषेध केला आहे.
या घटनेतील दोषींवर प्रशासनाने योग्य कारवाई करावी. अन्यथा, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा (तालुकाध्यक्ष) संतोष जौजांळ, (जिल्हा उपाध्यक्ष) संतोष गलांडे, म्हसे गावचे (सरपंच) सुखदेव फाजगेंसह कार्यकर्त्यांनी निवेदनातुन दिला आहे.
यावेळी भिल्ल समाजाचे नेते व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अशोक मोरे, लोकशिक्षण प्रतिष्ठानचे (अध्यक्ष) प्रमोद काळे, ऑल इंडिया पँथर सेनेचे (तालुकाध्यक्ष) पवन रणदिवे तसेच, युवा कार्यकर्ते अक्षय फाजगे, रामदास फाजगे, सनी जाधव, मनोज रणदिवे, सागर शिंदे यांचे सह पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)
