दिनांक २६ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:
पहेलगाम, काश्मीर येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा श्रीगोंद्यात मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे शेकडो मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द केले.

या निषेध सभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते झहीरभाई जकाते, अरविंद कापसे, तसेच मौलाना आतार यांनी मार्गदर्शन केले.

“दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी झहीरभाई जकाते यांनी यावेळी व्यक्त केली.

तर, “दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. समाजात दुफळी निर्माण होईल अशा प्रकारे या घटनांचा कोणीही वापर करू नये,” असे मत अरविंद कापसे यांनी मांडले.

या निषेध सभेला नगरसेवक निसार बेपारी, वसीमभाई ताडे, आसिफ पठाण, डॉ. जमादार, समीर काझी, रिजवानभाई जमादार, मौलाना रहीम जकाते, मुदतसर मालजपते, सोहेल शेख, शहानवाज इनामदार, राजू पठाण, सद्दाम शेख, आतिफ शेख, मुसा मालजपते, इम्तियाज ताडे, फिरोज जकाते, इलियास पठाण यांच्यासह अनेक मुस्लिम समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.

मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारकडे अशी मागणी करण्यात आली की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करावी, त्यांना कठोर शिक्षा द्यावी आणि देशात शांतता, सौहार्द व एकोपा कायम राहील यासाठी पावले उचलावीत. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून केंद्र व राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
