पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध: श्रीगोंद्यात अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया कडून भव्य मोर्चा व निवेदन..

दिनांक २ मे २०२५, श्रीगोंदा:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा येथे अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया यांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रीय अध्यक्ष जिंदाल साहेब व उपाध्यक्ष दिलीप नाना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मनीष खुराणा व महिला प्रदेशाध्यक्ष सौ. उमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा श्रीगोंदा बस स्टँडपासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार मिलिंद जाधव व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. मोर्चापूर्वी दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप नाना सोनवणे आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद वामन हजारे यांनी आपल्या भाषणात या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली. त्यांनी म्हटले की, “पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा भारतीय नौदल व मोदी सरकारने तीव्र आणि ठोस प्रत्युत्तर द्यावे, हाच खरा श्रद्धांजलीचा मार्ग आहे.”

या वेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद वामन हजारे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष बशीर भाई शेख, ॲडवायझर डायरेक्टर विष्णू भाऊसाहेब डांगे, औरंगाबाद प्रेसिडेंट सुदाम गाडेकर, बीड जिल्हाध्यक्ष कुंडलिक खेडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जगताप, डायरेक्टर शनिदेव घोडके आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

रॅली सह स्थानिक प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading