नाचून नव्हे तर महामानवांचे विचार आत्मसात करून जयंती साजरी करावी – प्रा. प्रशांत चव्हाण..

दिनांक २ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:

शिरसगाव बोडखा येथे क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला संयुक्त जयंती उत्सव दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध महामानवांची जयंती साजरी करताना केवळ नृत्य आणि गाण्यांवर भर न देता, त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान आत्मसात करण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस आयु. सतिश ओहोळ हे होते.

चिमुकल्यांपासून ते तरुणाईपर्यंत सर्वांनी आपले विचार मांडले आणि उपस्थितांचे मन जिंकले. प्रमुख वक्ते प्रा. प्रशांत चव्हाण यांनी समाज प्रबोधन करताना म्हटले की, “नाचून नव्हे तर महामानवांचे विचार आत्मसात करून जयंती साजरी केली पाहिजे.

आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे, ही बाब चिंतेची आहे. मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, ही आपली जबाबदारी आहे.”

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये अनिल कांबळे (उपसरपंच, ग्रामपंचायत निर्वी), शशिकांत जगताप (चिंचणी), ॲड. महेंद्र शिंदे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. सतिश ओहोळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात नुकत्याच घोषित झालेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या नवनियुक्त तालुकाध्यक्ष शांताराम उबाळे, संघटक अमोल कांबळे आणि प्रचार सचिव अनिल उबाळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी ॲड. महेंद्र शिंदे, बादशहा सय्यद, दादा कोळपे, भानुदास सोमवंशी (चेअरमन, शिरसगाव सोसायटी), संतोष उबाळे, सुनील उबाळे, वाल्मीक दळवी, राहुल सोमवंशी, मा. ग्रा. पं. सदस्य संतोष उबाळे, उपसरपंच अमोल उबाळे, जुबेर सय्यद (व्हॉइस चेअरमन, शिरसगाव सोसा), संजय उबाळे, बाळासाहेब उबाळे यांच्यासह अनेक तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन संतोष उबाळे यांनी केले.

स्रोत:(पत्रकार आदेश उबाळे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading