दिनांक २३ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
वीज वितरण कंपनी मार्फत मिळणाऱ्या तुटपुंजा वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना यातून सुटका मिळावी. म्हणून, स्थानिक प्रशासनाच्या पिंपरी कोलंदर सब स्टेशनचे अधिकारी बाराहाटे यांना वंचित बहुजन आघाडीचे (तालुकाध्यक्ष) संतोष जौजांळ यांनी निवेदन सादर केले आहे. शेतीसाठी येणाऱ्या लाईटचे वेळापत्रक बदलावे. असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पिंपरी कोलंदर सब स्टेशन मधून येणाऱ्या लाईटचे वेळापत्रक सध्या शेतकऱ्यांसाठी त्रासदायक असल्याचे जौजांळ यांनी निवेदनात म्हटले आहे. रात्री १ ते सकाळी ६, दुसऱ्या सत्रात सकाळी १० ते सायंकाळी ५, तिसऱ्या सत्रात सायंकाळी ५ ते ६ व रात्री १० ते १ प्रमाणे लाईट असणार आहे. त्यामुळे सलग दोन सत्रात रात्रीचा वीज पुरवठा होणार असून, शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागनार आहे.
रात्रीची थंडी आणि बिबट्याचा वावरं अशा अडचणीत शेतकऱ्याला शेतावर पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. रात्रभर जागून, परत दिवसभराची कमं..! यामुळे या भागातील शेतकरी पूर्ण वैतागला आहे. या भागातील लाईट तीन तास कपात आणि सलग दोन सत्र रात्रीची राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

लाईट वेळापत्रकामध्ये बदल करून, परिसरातील शेतकऱ्यांचा होणारी गैरसोय दूर करावी. अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे. याबाबतचे निवेदन कनिष्ठ अभियंता बाराहाते (सबस्टेशन पिंपरी कोलंदर) यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर संतोष जौजांळ (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, श्रीगोंदा), विजय संपत पठारे, नवनाथ रामदास जाधव, स्वप्नील सुनील मोहारे, रवींद्र रंगनाथ जौजांळ, संपत मच्छिंद्र देविकर इत्यादी कार्यकर्ते व पीडित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

निवेदन स्वीकारतांना कनिष्ठ अभियंता बाराहाते यांनी आजपासून रात्री १ ते ६ येणारी शेती पंपाची लाईट, रात्री १ ते सकाळी ७ पर्यंत सोडणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.
स्रोत:(निवेदन)
