दिनांक २३ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
सौ. मिनाबाई विष्णु बांगर राहणार श्रीगोंदा कारखाना यांनी दिनांक १६ ऑक्टोबर २१ रोजी फिर्याद दिली होती की, रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान रामराव ढिकले (पोलीस निरीक्षक) श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर घरफोडी ही शुभम उर्फ मुन्ना तात्या घोडेकर वय ३५ वर्षे राहणार श्रीगोंदा कारखाना (ता. श्रीगोंदा) याने केली आहे.

पोनि ढिकले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सदर संशयित इसमास ताब्यात घेवुन, चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार सदर ईसमास ताब्यात घेत त्याचेकडे कसून चौकशी केली असता, त्याने घरफोडी केली असले बाबतची पोलिसांना कबुली दिली आहे.

आरोपीकडुन गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे मणी, कानातील झुबे व गळ्यातील गंठण असे ५० ग्रॅम वजानाचे दोन लाख पंचविस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असुन, त्याचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास (पोलीस नाईक) गोकुळ इंगवले करीत आहेत. Shrigonda.. Five weights of gold, jewelery worth Rs.2,25000
सदरची कारवाई (मा.पोलीस अधिक्षक) श्री.मनोज पाटील साहेब, (मा.अप्पर पोलीस अधिक्षक) सौरभकुमार अग्रवाल साहेब, (मा.उपविभागीय पोलीस अधिकारी) श्री.अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) श्री. रामराव ढिकले, (सपोनि) दिलीप तेजनकर, (पोसई) अमित माळी, (सफौ) अंकुश ढवळे, (पोना) गोकुळ इंगवले, (पोकॉ) प्रकाश मांडगे, (पोकॉ) किरण बोराडे, (पोकॉ) दादा टाके, (पोकॉ) अमोल कोतकर यांनी केली आहे.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाणे)
