श्रीगोंदयातील अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला वैमानिक..

दिनांक २४ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मनात महत्त्वाकांक्षा आणि प्रबळ इच्छाशक्ती असली. की, कोणतेही अवघड यश संपादन करता येते. गरिब परिस्थिती हे कारण दाखवणे चुकीची ठरते. मुळात गरीबी ही परिस्थिती नसून, ती माणसाची मनस्थिती आहे. अश्याच कठीण परिश्रमाच्या जोरावर श्रीगोंद्यातील एका युवकाने मोठी गगन भरारी घेतली आहे. वास्तवात आई अंगणवाडी सेविका असतांना, परिस्थितीशी दोन हात करत, झगडत त्याने वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील हिंगणी दुमाला या गावचे रहिवासी असलेले शशिकांत भाऊसाहेब गुंजाळ यांनी साधारण परिस्थितीवर मात करत, जिद्द, चिकाटी आणि मेहनतिच्या जोरावर पायलट (वैमानिक) होण्याचे स्वप्न प्रत्येक्षात उतरवले आहे.

दिनांक १५ ऑक्टोबर २१ रोजी विजयादशमी निमित्त झालेल्या कार्यक्रमात ह.भ.प. बाबाजी महाराज चाळक यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. येवती ता.श्रीगोंदा येथील अंगणवाडी सेविका म्हणून, कुसुम भाऊसाहेब गुंजाळ या सेवा करत आहेत. १९९० साली त्यांचे पती परागंदा झाले. ते परत आलेच नाहीत. त्यांची परिस्थिती बेताची असल्याने फार आधार नव्हता.

त्या ८ महिन्याच्या लहान मुलाला घेऊन आपल्या माहेरी वडिलांकडे आल्या आणि मंग कुसुम गुंजाळ यांचा खरा जिवन संघर्ष सुरु झाला. त्यावेळी त्यांना अंगणवाडीचे ३०० रुपये मानधन मिळतं.! त्यात त्या रोज सायकलवर १६ कि.मी.चा प्रवास करीत असे. मुलाच्या शिक्षणासाठी काही कमी पडू नये. यासाठी त्या आईने अहोरात्र कष्ट सोसले.

शशिकांतचे १ ली ते ४ थी प्राथमिक शिक्षण जी.प.शाळा करतारवाडी हिंगणी दुमाला येथे झाले. त्यानंतर ५ वी ते ७ वी संत निंबराज महाराज विदयाधाम प्रशाला देवदैठण येथे झाले. ८ वी ते १० वी संत खंडेश्वर विद्यालय यवती येथे तर, पुढे चा.ता.बोरा महाविद्यालयातून ११ वी १२ सायन्स पदवी घेतली.

भींतीवरील पोष्टर पाहून, वैमानिक बनण्याची इच्छा त्याच्या मनात घर करून राहिली. पुढे हिंदुस्थान एरोस्पेस, पुणे येथून विमान दुरुस्ती अभियंता पदवी त्याने संपादन केली. घरची आर्थिक परिस्थीती बेताची असल्याने, शशिकांतने प्रथम एका कंपनीत वर्षभर जॉब केला.

यावेळी माध्यमांशी बोलतांना शशिकांत गुंजाळ यांनी सांगितले की, जगतांना आईचे कष्ट व तिचा जीवन संघर्ष डोळ्यासमोर दिसत होता. त्यामुळे कॉलेज जीवनातील मौज, मजा व स्वत:च्या अपेक्षा मर्यादित ठेऊन, काही तरी करायचे ध्येय आंतरमनाशी बाळगले होते. माझ्यासाठी आधार असलेल्या माझ्या आईचे कष्ट मला ऊर्जा अनं बळ देत होते. शशिकांतचा हा प्रवास खूप खडतर आहे. अभ्यासात सातत्य व वास्तवाची जाण असलेला माणूस कठीण परिस्थितीतही यश संपादन करतो. असे गुंजाळ यांनी सांगितले.

शशिकांत गुंजाळ यांची कौटुंबिक परिस्थिती पाहून (व्हेंग कांमांडर) अरुण देशमुख, (कॅप्टन) निखिल जाधव, मनीष मुथा, चैतन्य शाळीग्राम व दीपक नवले यांनी खूप सहकार्य केले. त्यांचे उपकार विसरूच शकनार नाही. असे शशिकांतने सांगितले. The son of an Anganwadi worker from Shrigonda became a pilot.

माझ्या सैरभैर झालेल्या जीवनात पुढे अंधार असतांना, मुलाने वैमानिक होऊन, घेतलेली भरारी ही गगनात न मावणाऱ्या आनंदा येवढी आहे. मुलाच्या यशात नातेवाईक आणि माझ्या सहकारी मैत्रिणी यांचा मोलाचा वाट आहे. असे शशिकांतच्या आई कुसुम गुंजाळ यांनी नमूद केले.

स्रोत:(पत्रकार, अमोल बोरगे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading