श्रीगोंदयात दलित समाजाला दुय्यम वागणुक का.? स्व.बापूंच्या पुतळा अनावरण कार्यक्रम पत्रिकेत पं.स. सभापतींचे नाव वगळले..!

दिनांक २४ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

तालुक्याच्या राजकारणासह समाजकारणात अग्रणी असणाऱ्या नेत्यांसोबत प्रामाणिक साथ देणारे मागासवर्गीय समाजाचे पदाधिकारी प्रत्येक कार्यक्रमात, उपोषणात, आंदोलनात बरोबर असतात. मात्र, ज्यावेळी सन्मानाची वेळ येते, त्यावेळेस मागासवर्गीय कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जा दिला जातो. असा आरोप करत, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप यांनी स्वर्गीय शिवाजी बापू नागवडे यांच्या प्रतिकृती पुतळा अनावरण कार्यक्रम पत्रिकेत पंचायत समितीच्या विद्यमान सभापती गितांजलीताई पाडळे यांचे नाव नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

मा आ. स्व.आदरणीय शिवाजीराव (बाप्पू) नागवडे यांचा प्रतिकृती पुतळा अनावरणाचा कार्यक्रम देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते ठेवण्यात आलेला आहे.

नमूद कार्यक्रम पत्रिकेत तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांची नावे टाकण्यात आलेले आहेत. पण, श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे प्रथम नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सभापती गीतांजली (ताई) पाडळे यांचे नावं या पत्रिकेतून वगळण्यात आले आहे. सामाजिक माध्यमांतूनही या बद्दल नाराजीचा सूर येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

संदीप उमाप यांच्या म्हणण्यानुसार पाडळे ताईंचे नावं जाणीवपूर्वक कार्यक्रम पत्रिकेत टाळण्यात आले आहे. मागासवर्गीय व दलित समाजाच्या पदाधिकाऱ्यांना असमानतेची वागणूक देणे योग्य नाही. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने आमच्या दलित समाजाला कायम दुय्यम वागणुक का.? असा सवाल उमाप यांनी उपस्थित केला आहे.

स्रोत:(संदीप उमाप)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading