अल्पवयीन मुलीवर अत्याचार करनाऱ्या, आरोपीस श्रीगोंदा न्यायालयाने ठोठावली ५ वर्षे सक्त मजुरीची सजा..!

दिनांक २५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करत, त्याबद्दल कोणाला सांगितल.? तर, तुला जीव मारीन.! अशी धमकी पीडितेला दिली. सदर घटना सन २०२० मध्ये घडली होती.

याप्रकरणी आरोपीला श्रीगोंदा न्यायालयाने पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सचिन पवार (जामखेड, जिल्हा अहमदनगर) असे शिक्षा झालेला नराधम आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर पवार विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला पॉक्सो व अत्याचारा संदर्भातील गुन्हे दाखल करण्यात आले होते.

जामखेड पोलीस ठाण्याचे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) निलेश कांबळे यांनी याप्रकरणी तपास करून, श्रीगोंदा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकारी पक्षाच्या वतीने Ad.अनिल घोडके यांनी नमूद पीडितेची बाजू मांडली. Shrigonda court sentences accused of torturing minor girl to 5 years hard labor ..!

पवार विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. निलेश कांबळे यांनी करत, न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यावर सरकारी पक्षाच्या वतीने वकील अनिल घोडके यांनी पीडित मुलीची बाजू मांडली. नमुद प्रकरणी श्रीगोंदा न्यायालयाने निकालांती आरोपी सचिन पवार याला दोषी धरून, पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading