डोक्यात लोखंडी सळई घालून, केले रक्तबंबाळ..! RPI(आ) च्या तालुकाध्यक्षाचा प्रताप..!

दिनांक २५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

शहरातील आढळगाव रोडवर असलेले एम.जे. हॉटेल येथे जेवण करायला गेलेल्या RPIच्या तालुका अध्यक्षाने मित्रासोबत अजब प्रकार केलेला आहे. काल रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर वेटरला सिगारेट आणायला सांगितली. ती आणण्यास विलंब झाल्याचा राग अनावर होऊन, राजा जगताप व रघुनाथ शिंदे या दोन इसमांनी नमूद वेटरला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत, डोक्यातं लोखंडी सळई घालून, गंभीर दुखापत केली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे अध्यक्षांचे नाव मात्र, चांगलेच चर्चेत आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वाजता शहरातील MJ या मानव जाधव यांच्या हॉटेलवर राजा जगताप व त्याचा मित्र रघुनाथ शिंदे हे दोघे जेवण करायला गेले. जेवणाची ऑर्डर दिली, जेवण केले, जेवण केल्यावर सिगरेटची तलब झाली, सिगरेटची ऑर्डर दिली. मात्र, सिगारेट आणण्यास वेटरला विलंब झाला. अनं याचाच राग अध्यक्ष्यांच्या डोक्यात गेल्याने, वेटरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, त्याच्या डोक्यात लोखंडी सळईने प्रहार केले.

एवढे होऊनही हॉटेल मालक मानव जाधव यांच्या मध्यस्थीने सदरील वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्ष काय ऐकायला तयार नव्हते. त्यांच्या हातून झालेल्या गंभीर दुखापतीमुळे, रात्री उशिरा नमूद वेटरला येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार देण्यात आले. यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यांमध्ये भादवि कलम ३२४ नुसार राजा जगताप (श्रीगोंदा) व रघुनाथ शिंदे (आढळगाव) या दोन इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सामाजिक संघटनांचे पदाधिकारी म्हणून, मिरवणारे व इतरांचे प्रश्न मिटवण्यासाठी अग्रणी असणारे आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजा जगताप यांच्या या कृत्यामुळे त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. मारहाण करून, किरकोळ गोष्टीसाठी लोकांना रक्तबंबाळ करणारे कार्यकर्ते जर, आरपीआय सारख्या जिम्मेदार संघटनेचे पदाधिकारी असतील.? तर, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ही घटना विचार करायला भाग पाडत आहे.

यामध्ये जखमी झालेल्या युवकाचे नाव बिनोद विष्णू जयस्वाल (वय १८ वर्ष) राहणार नेपाळ, हल्ली राहणार एम.जे. हॉटेल श्रीगोंदा असे आहे. Bloodshed with an iron spear in the head.. Pratap of the taluka president of RPI (A)..!

खालील फोटो तुम्हांला विचलित करू शकतो.!

स्रोत:(दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दाखल फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading