दिनांक २६ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
अंधाराचा फायदा घेत दरवाजा तोडून दरोडे घालणाऱ्या श्रीगोंद्यातील सराईत आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद कारवाई केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी असलेले जहीर घड्याळा चव्हाण उर्फ जावेद (वय वर्ष २५) व महावीर घड्याळ चव्हाण (वय वर्ष २१) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे (पोलीस निरीक्षक) कटके यांच्या सूचनेनुसार व (सहाय्यक निरीक्षक) सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १८ ऑक्टोबर २१ रोजी पारनेर तालुक्यातील सुपे गावचे रहिवासी असलेले निवडूंगे कुटुंब आपल्या परिवारासह रात्री घरामध्ये झोपलेले असतांना, अनोळखी इसमांनी सेफ्टी दरवाजा व लाकडी दरवाजा तोडून, घरात घुसत, घरातील लोकांना लोखंडी कटावणी व गजाने मारहान करीत, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७८ हजार रुपयांचा ऐवज कपाटातून लुटला होता. या घटनेनंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये सरिता निवडुंगे यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर पोलिसांना तपासा दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सदरील गुन्हा जावेद चव्हाण व महावीर चव्हाण दोघे राहणार सुरेगाव, तालुका श्रीगोंदा यांनी व त्यांच्या साथीदारांनी मिळून केल्याचे खात्रीलायक माहिती मिळाल्यावर त्या दोघांनाही सुरेगाव शिवारातील डोंगरात पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, सदर गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. आरोपींनी गुंडेगाव (तालुका नगर), राळेगण थेरपाळ (तालुका पारनेर), यवत (तालुका दौंड) या ठिकाणाहून चोरलेल्या चार दुचाकीबाबत संबंधित पोलीस स्टेशनला चौकशी करण्यात आली. तर, नमूद गुन्ह्याबाबत खात्री झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. Shrigonda… Police arrested the accused in serious crimes like robbery, theft and robbery by showing the lure of cheap gold ..!
या दोघां विरोधात यापूर्वीही दरोड्याची तयारी, स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून दरोडा घालणे, चोरी, मारामारी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर जावेद उर्फ जहीर चव्हाण हा तीन गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
प्रतीकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
