अखेर रेखाचा वनवास संपला..! अनं रोज शिक्षणासाठी होणारी पाच किलोमीटरची पायपीट थांबली..!

दिनांक २५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

घरात शैक्षणिक वातावरण नाही. दररोज दिव्याखाली अभ्यास आणि बेलवंडी कोठार ते श्रीगोंदा अशी पाच किमीची पायपीट करुन, पारधी सामाजातील मुलीने बारावीत  ८९ %  गुण मिळवुन महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अग्नीपंख फौंडेशनने रेखाला सायकल भेट देऊन, तिच्या या इच्छा शक्तीला बळ दिले आहे. सायकल भेटीमुळे रेखाचा पायपीट वनवास संपला आहे.

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, (सहाय्यक पोलीस निरीक्षक) दिलीप तेजनकर, (उपप्राचार्य) मधुकर खोमणे यांच्या हस्ते रेखाला सायकल देण्यात आली.

बेलवंडी कोठार येथील शिवल्या व कौसाबाई काळे यांना दोन मुले आणि चार मुली, घरची परिस्थिती बेताची, पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का, त्यामुळे कधी मधी पोलिसांची छापेमारी..! अशा परिस्थितीत रेखा व तिची बहीण काजल यांनी शिकायचं आणि शिक्षणातून यशाचे शिखर गाठायचे.! अशी प्रतिज्ञा केली. कोरोना महामारीत बस बंद असल्याने दररोज रेखाने बेलवंडी ते श्रीगोंदा असा पाच किमीचा प्रवास केला आणि बारावीत कला विभागात ८९% गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला. या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.

अग्नीपंख फौंडेशन ने रेखाला आपले ध्येय गाठण्यासाठी सायकल भेट दिली. दिवाळीनंतर तिला स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

सहाय्यक (पोलीस निरीक्षक) दिलीप तेजनकर म्हणाले की, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणेने श्रीगोंद्यातील अग्नीपंख फौंडेशन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ही अभिमानाची बाब आहे. Rekha’s exile is finally over ..! Five kilometers of pipeline for daily education!

प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के म्हणाले की, अग्नीपंखचे काम नुसते विद्यार्थ्यांना मदत करण्यापुरते मर्यादित राहिले नसुन, दिव्यांग माने कुंटुबास अग्नीपंखने विद्यार्थ्यांच्या मदतीने चार लाख किमतीचे घरकुल बांधून दिले असुन, कोरोना काळात औषधे वाटप आणि कोरोना योध्याचां सन्मान केलेला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी आहे.

स्रोत:(अग्निपंख फौंडेशन) 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading