दिनांक २६ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
निव्वळ राजकीय वैमनस्यातून परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. शहरातील आढळगाव रोड लगत असलेल्या हॉटेलमध्ये रात्री झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन करून, काही लोकांनी या घटनेला राजकीय वळण लावल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

शहरातील हॉटेलवर परप्रांतीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई घालून गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली होती. ह्या घटनेची वास्तविक परिस्थिती वेगळे असून, मला नमूद प्रकरणात अडकवत राजकीय सूड साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीतून केला आहे.

दिनांक २४ ऑक्टोबर २१ रोजी रात्री १२:०० वाजण्याच्या दरम्यान आढळगाव रोड वरील हॉटेलमध्ये मालक आणि जेवायला आलेल्या गिर्हाईकांमध्ये झालेल्या वादाचा काहींनी राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केल्याचे जगताप यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुषार जगताप आणि त्याचा मित्र आढळगाव रोड वरील MJ हॉटेलमध्ये जेवायला गेले असतांना, जेवण आणायला उशीर झाला म्हणून, विचारना केली. तर, राग आल्यामुळे मालक मानव जाधव आणि कामगार विनोद जयस्वाल (राहणार नेपाळ) व इतर दोघांची जेवायला आलेल्या तुषार जगताप आणि त्यांचा मित्र यांचेबरोबर बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर दोन्ही गटांची मारामारीत झाले. लाथा, बुक्क्यांनी तसेच तंदूर रोटी काढायच्या लोखंडी सळईने एकमेकांना जबरी मारहाण करण्यात आली. त्यातूनच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत दोन्ही गटांवर परस्पर विरोधी ३२४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत आरपीआय तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी माध्यमांना सांगितले की, मला घडलेल्या घटनेनंतर हॉटेल वरून फोन आल्यामुळे मी घटनास्थळी गेलो होतो. वाद झालेल्या त्या सर्वांना समजून सांगितले व नमूद भांडण मिटवले होते. नंतर काही लोकांनी राजकीय हेवेदावे व वैयक्तिक रोषापोटी मला या प्रकरणात जोडण्यासाठी माझ्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करीत, नमूद प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. माझी राजकिय व सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे. या घटनेचे वास्तव प्रशासनाच्या तपासात निष्पन्न होईलच. मला पोलीस यंत्रनेवर पूर्ण विश्वास आहे. असे मत राजाभाऊ जगताप यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे. All will be concluded in the police investigation! I have full faith in the system.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
