दिनांक १६ ऑगस्ट, श्रीगोंदा:
तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे बुद्धिस्ट ध्यान धारणा केंद्राचे उदघाटन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जौजाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे (जिल्हा उपाध्यक्ष) संतोष गलांडे, तसेच (युवा नेते) संतोष जठार, वांगदारी गावचे आंनता पवार, येळपने पिसोरे गावचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र थोरात, बोरी गावचे मा. उपसरपंच जयेश थोरात, म्हसे येथील संभाजी फाजगे, अक्षय फाजगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

संतोष जौजांळ यांची वंचित बहुजन आघाडीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तसेच, वाई तालुक्यातील जोरवे गाव येथील पूरग्रस्तांना मदत केल्यामुळे पारगाव ग्रामस्थ व समाज बांधवांकडून संतोष जौजांळ यांचा सत्कार व गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन पारगावचे युवा कार्यकर्ते बाळासाहेब आल्हाट व सागर आल्हाट यांनी केले. तर, सूत्रसंचालन रतन गोरखे व भारत आल्हाट यांनी केले. Inauguration of Buddhist Meditation Center at Pargaon Sudrik ..
या कर्यक्रमास दत्ता गोरखे, रावसाहेब इगावे, अक्षय गोरखे, नासिर शेख, शेखर आल्हाट, अनील घोडके, लखन जावळे, मंदा जावळे, रेखा आल्हाट आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

सागर आल्हाट यांची तालुका कार्यकारणीत समावेश करण्यात आला. त्यांना उपाध्यक्षपद दिल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
स्रोत:(संतोष जौजांळ यांचे प्रसिद्धीपत्र)
