दिनांक १६ ऑगस्ट, श्रीगोंदा:
१५ ऑगस्ट २०२१ या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील पिसोरे खांड येथील मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये तसेच ग्रामपंचायतच्या अंतर्गत रस्त्याच्या बाजूने वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे महत्व पटवुन सांगितले. Tree planting at Pisorekhand on the occasion of Independence Day.
वृक्ष लागवडीसाठी गावातील (सरपंच) विकास हनुमंत इंगळे, (उपसरपंच) अविनाश फक्कड ओहोळ, सर्व ग्रा.पं.सदस्य, ग्रा.पं. कर्मचारी व (ग्रामसेवक) बी.एस. धायगुडे यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमात गावातील ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रदिसाद दिला.

यावेळी महेंद्र इंगळे, उद्धव येरकळ, दिपक इंगळे, पठाण इंगळे, विलास येरकळ, कैलास येरकळ, शिवाजी श्रीराम (ग्रा.पं.सदस्य) सुनील ओहोळ, अंबादास कदम, सुलेमान शेख, अमोल गोरे, शाम जरे, संतोष कुदांडे, शरद श्रीराम, काशिनाथ जगताप, सुनिल गोरे, संदीप गोरे, दत्ता खवळे, वंदना विजय गावडे (पोलीस पाटील), नवनाथ थोरात (पाणीपुरवठा कर्मचारी), शिवाजी शिंदे (ग्रा.पं.कर्मचारी), प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका व इतर सर्व गावातील नागरिक उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
