साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती काष्टीत साजरी.

दिनांक २ ऑगस्ट,काष्टी/श्रीगोंदा:

Covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून शांततेत अण्णाभाऊंच्या प्रतिमेस काष्टी येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे निमित्त साधत सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मदने तसेच प्रशासकीय अधिकारी श्यामवेल गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी महामानव डॉ. बाबा आमटे यांच्या अनाथ मुलांच्या शाळेला भेट दिली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्ताने आश्रमात वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये आंबा, चिकू, पेरू, चिंच, फणस अशी फळांची झाडे लावण्यात आली. महामानव डॉ. बाबा आमटे शाळेतील मुलांना मिठाई देण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवर गायकवाड (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक) श्रीगोंदा, सुनिल दरेकर (चेअरमन, खुलेश्वर पतसंस्था) महेश दरेकर (सदस्य, ग्रामपंचायत काष्टी) गणेश कदम (अध्यक्ष, परीट समाज संघटना अहमदनगर जिल्हा)  मनोहर पवळ (अध्यक्ष, क्रांतिवीर लहुजी टायगर सेना श्रीगोंदा तालुका) शांतीलाल मदने (कट्टर समर्थक एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य)

स्रोत:(शांतीलाल मदने यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading