लोकसहभागातून हायटेक विद्यामंदिरे

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या अग्नीपंख फाउंडेशनने यावर्षी ‘ डॉ.अब्दुल कलाम बेस्ट स्कुल अवॉर्ड ‘ आणि ‘ बेस्ट स्कुल अॅण्ड लीडर ‘ हे कॉफीटेबल बुक बनवले गेले हे सर्वांसाठी खुप प्रेरणादायी आहे . -निळकंठ बोरूडे , विस्तार अधिकारी ( शिक्षण ) , पंचायत समिती, श्रीगोंदा

शाळेला गावाचा आधार वाटावा आणि गावाला शाळेचा अभिमान वाटेल अशा शाळेतच उद्याच्या सुजाण नागरिकांची घडण होत असते . त्यामुळे शाळेला जिथे अडचण असेल तिथे पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने शाळेसाठी उभे राहणे गरजेचे असते . शाळेचे काम जर उत्तम असेल तर मोठ्या प्रमाणात प्रमाणात समाजातील दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थाही उत्स्फुर्तपणे काम करतात . यातुनच श्रीगोंदा तालुक्यात अनेक शाळा लोकसहभागातून हायटेक विद्यामंदिरे म्हणून पुढे येत आहेत .

ग्रामीण भागातील घटत चाललेली लोकसंख्या आणि शहरी भागात सुखसोयींमुळे मुलांचे शिक्षण तिकडेच करावे . या परिस्थितीमुळे शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांना भविष्यात आपल्या अस्तित्वासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे . यासाठी लोकसहभागातून ज्ञानमंदीरे हायटेक करणे काळाची गरज झाली आहे .

स्पर्धेच्या काळात आपल्या पाल्यास दर्जेदार शिक्षण मिळावे ही पालकांची अपेक्षा असते . शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शिक्षण स्वस्त आहे . ग्रामीण भागातील शाळाही दर्जेदार शिक्षण देऊ शकतात हे काही शाळांनी नाविण्यपूर्ण उपक्रम घेऊन दाखवून दिले आहे . शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी शाळांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी सुट्टीच्या दिवशी शिक्षक आपल्या दारी हे अभियान हाती घेण्याची गरज आहे . यासाठी स्कुल कमेटी निवडतानाच सक्षम निवडणे , पालक – शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचा सोशल मिडियावर गृप बनवून त्याद्वारा शाळेतील विविध उपक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती आणि अशा उपक्रमांना माजी विद्यार्थी आणि दानशूर व्यक्तींना निमंत्रित करणे आणि उचित सन्मान करून शाळेत काय करणे गरजेचे आहे . याची माहिती दिली तर यातून लोकसहभागी चळवळ उभी राहू शकते .

शाळांची रंगरंगोटी , ई – लर्निंग सुविधा , संगणक एल.ई.डी प्रोजेक्टर , लॅपटॉप , टॅब , इन्व्हर्टर , प्रिंटर , वॉटर फिल्टर , खेळचे मैदान आणि साहित्य , शैक्षणिक साहित्य , संरक्षक भिंत इत्यादी सोयी उपलब्ध करणे . जर शाळांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आणि शिक्षकांनी आत्मीयतेने ज्ञानदान केले तर तर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण होईल आणि प्राधान्याने पालक आपल्या घराजवळील , गावाकडील शाळांना प्राधान्य देतील .

महाराष्ट्रातील क्वचितच गावे अशी आहेत की , गावच्या लोकसंख्येपेक्षा विद्यार्थीसंख्या जास्त आहे . अशा प्रगती साधलेल्या शाळांना शिक्षक , शालेय व्यवस्थापन समिती , पलक यांनी भेटी देऊन या शाळांतील उपक्रम आपल्या शाळेत राबवून प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत .

लोकसहभागातून विद्यार्थी , शिक्षक , पालक यांचा उत्सफुर्त प्रतिसाद , सर्व शिक्षा अभियान , विविध गुणदर्शन , बाल आनंद मेळावे , श्रमदान या माध्यमातून शाळांच्या गरजा , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग संजिवनी ठरत आहे . यातून शाळांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण झाल्या असून लोकसहभागातून ज्ञानमंदीरे हायटेक प्रगतीकडे झेपावत आहेत. (नमूद माहिती पुस्तक प्रकाशित झाले त्यावेळेसची आहे)

स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading