श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे बाह्यरंग बदलतांना, अंतरंगात व तुमच्या आंतरमनात महापुरुष वसु द्यात..!

‘नंबर वन’ होत चाललेल्या पोलीस स्टेशनला महापुरुषांचा विसर..? पोलीस निरीक्षक ढिकले यांची असमाधानकारक कारवाई..!

दिनांक १५ ऑगस्ट, श्रीगोंदा:

वेगवेगळ्या प्रकारची सन्मानं, सन्मानपत्रं, ट्रॉफीज, पुरस्कार, सुसज्ज व आधुनिक सुविधांयुक्त कार्यालय तसेच, अवैध धंदे मुक्त कार्यक्षेत्र, कमीत-कमी चोर्‍या, घरफोड्या, सामान्यांना सन्मानं, दलित मागासवर्गीयांची तात्काळ कामं करणारे.. त्यांच्या मागण्या ऐकून घेणारे.. अशा वेगवेगळ्या संपन्न गुणांनी ठाचून भरलेले पोलीस स्टेशन म्हणून, श्रीगोंदा पोलीस स्टेशनची सर्वत्रच ओळख होऊ लागलेली आहे. त्यातच ते आता ‘नंबर वन’ वर पोहोचण्याच्या कगारवर आहे. मात्र, या उंचीवर पोहोचवणाऱ्या पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांना मात्र, महापुरुषांच्या विचारांचा विसर पडल्याचे निदर्शनास येत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी सामाजिक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावाव्यात. असे पत्र सादर करण्यात आले होते. या पत्रावर कारवाई करण्यास दिरंगाई करीत, महापुरुषांच्या प्रतिमा पोलीस स्टेशनला नसतात म्हणत कार्यकर्त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती.

१५ ऑगस्ट पूर्वी प्रतिमा न लावल्यास आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सामाजिक संघटनानीं दिला होता. त्यावर स्थानिक पोलीस प्रशासनाने नमूद कार्यकर्त्यांना बोलावुन पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयामध्ये फुले, शाहू, आंबेडकर या तीनच प्रतिमा लावून, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यासह इतर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यासाठी उदासीनता दाखवली. लावण्यात आलेल्या तिन्ही प्रतिमा पाठमोऱ्या लावण्यात आल्या असून, शेवगाव कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या ट्रॉफी, सन्मानपत्र हे पोलीस निरीक्षक यांच्या खुर्चीच्या मागील भिंतीवर लावण्यात आल्या आहेत.

एक प्रकारे महापुरुषांच्या संपूर्ण प्रतिमा न लावता फुले, शाहू, आंबेडकर यांच्या तीन प्रतिमा लावून, इतर महापुरुषांचा अवमान केल्यासारखेच आहे. असे मत अनेकांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा पोलीस स्टेशनची ही असमाधानकारक कारवाई असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. पोलीस निरीक्षकांना स्वतःचे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह काढून महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात त्यांचा सन्मान दुखतोय का ? असा अनेकांनी सवाल केला आहे.

याबाबत १५ ऑगस्ट रोजी झेंडा वंदनानंतर तहसील कार्यालयात झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमात तालुक्यातील उपस्थित सन्माननीय मान्यवरांसमोर नंदूभाऊ ससाने (मातंग एकता आंदोलनचे अध्यक्ष) यांनी मांडलेल्या विषयाच्या अनुषंगाने अनिल ठवाळ यांनीही हा विषय हाताळला. मात्र, येथेही पोलीस निरीक्षक उर्वरीत फोटो लावण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समोर आले आहे.

बबनराव पाचपुते (आमदार), चारुशीला पवार (तहसीलदार) यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक ढिकले यांनी कोणत्याच पोलीस स्टेशनला अशा प्रतिमा नसतात. असे पुन्हा एकदा सांगितले आहे. यानंतर कार्यक्रमांमध्ये तहसीलदार चारुशिला पवार यांनी नमूद प्रकरणी तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे सांगितले. दोन दिवसांत पोलीस निरीक्षकांनी उर्वरित प्रतिमा न लावल्यास पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अनिल ठवाळ (जि.प.सदस्य) यांनी दिला आहे.

स्वतःचे पद, हुद्दा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ट्रॉफीज, मानपत्र या सर्वांचे दाते महापुरुषांचे विचार आहेत. असे असतांनाही स्वतःचे फोटो मिरवण्यासाठी पो.नि. ढिकले हे महापुरुषांच्या प्रतिमा पाठमोऱ्या लावून, त्यातही छत्रपती शिवाजी महाराज व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यासह निर्देशित असलेल्या इतर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यास नकारत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाणे जरूर ‘नंबर वन’ वर घेऊन जावे. त्याबाबत सर्वांच्या शुभेच्छा आहेत. मात्र, पोलीस स्टेशनचे बाह्यरंग बदलतांना अंतरंगात व तुमच्या आंतर मनात महापुरुष वसु द्यात.! अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांनीं व्यक्त केली आहे.

स्त्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading