श्रीगोंद्यातील सायकलपटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप..

दिनांक ११ ऑगस्ट, श्रीगोंदा:

अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा ते सातारा, श्रीगोंदा ते पंढरपूर महिला सायकल वारी तसेच बेलवंडी ते सरडे व श्रीगोंदा ते आष्टी सायकल वारी करुन, आॅलपिक खेळाडूंच्या आई, वडील, शिक्षकांना मानवंदना देणाऱ्या ६१ सायकल पटूचां सन्मान केला. यामध्ये शाळकरी मुले व महिलांचा समावेश होता.

हा सन्मान नायब तहसीलदार डॉ. योगीता ढोले, उपनगराध्यक्ष मनिषा लांडे, अशोक खेंडके, डॉ. नितीन खामकर, (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, पो.नि. रामराव ढिकले यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधमित्र किशोर उबाळे होते. यावेळी अग्नीपंखच्या वतीने किशोर उबाळे यांना व्यवसायासाठी पाच हजाराची मदत केली. 

पोलिस निरीक्षक रामराव ढिकले म्हणाले की, अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदेकरांची “प्रेरणा सायकल वारी, आॅलपिकवीरांच्या मंदीरी” हा उपक्रम खेळाडूंना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हाती घेतला. यामधून समाजात सकारात्मक संदेश जाईल सायकल चालविणे चळवळीस गती मिळेल. 

अंधमित्र किशोर उबाळे म्हणाले, सायकल वारी काढून इतरांना प्रेरणा देणे चांगले आहे. पण, माणसाने दररोज सायकल चालवून आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी डॉ. योगीता ढोले, नितीन खामकर, मंगेश देवरे, दत्ताजी जगताप, तुषार शिंदे, अश्विनी दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. Applause on the backs of cyclists in Shrigonda.

कार्यक्रमास प्रशांत गोरे, ज्ञानेश्वर गांजुरे,  शुभांगी लगड, मधुकर काळाणे, किसन वऱ्हाडे, बी बी गोरे उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. कानीफनाथ उगले यांनी केले.

स्रोत:(अग्निपंख फौंडेशन, श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading