दिनांक १७ ऑगस्ट, श्रीगोंदा:
शहरातील अवैद्य कारभाराचा चक्रावून सोडणारा चेहरा आता समोर येऊ लागला आहे. आपली पाळंमुळं घट्ट करत निव्वळ शहरातच मटक्यातून दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार शहरातील काही नामांकित पदाधिकारी मटका चालक असल्याचे समजते आहे. १०० पेक्षा जास्त रायटर्सची टीम त्यांनी तयार केली असून, काहीं मार्फत हजारोंचे तर, काही मार्फत लाखांचे कलेक्शन केले जात आहे.
यामध्ये शासकीय यंत्रनेतील कर्मचाऱ्यांसह काचा, पत्रा, भंगार वेचून उदरनिर्वाह चालवणारे सामान्य इसमही भरडले जात आहेत. आधुनिक मोबाईल तंत्राने सज्ज असलेली ही यंत्रणा, पोलीस प्रशासनाला मॅनेज केल्याशिवाय आपला कारभार चालवु शकत नाही. हे वास्तविक सत्य आहे. फोन पे, गुगल पे, व्हाट्सअप व इतर सामाजिक माध्यमांतून नमूद गोरख धंद्याने जोर धरला असतांना, पोलिसांची सायबर सेल यंत्रणा काय करते ? असा सवाल यातून उपस्थित होत आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, कोट्यावधींची रोज उलाढाल करणाऱ्या मटका या अवैद्य धंद्या विरोधात श्रीगोंदयाची पोलीस यंत्रणा व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले शांत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेल्या गैर व्यवसायावर नियंत्रण मिळवण्याऐवजी वाढत आणि पोसत चाललेल्या या असंविधानिक उद्योगावर स्थानिक पोलीसांची पकड मात्र, सैल होत असल्याची सर्वश्रूत चर्चा आहे.
श्रीगोंदा शहरांमध्ये चार ते पाच चालकांनी ज्यात दोन जण नगरसेवक असल्याचे समजते आहे. या सर्वांनी कोरोना लॉकडाऊनचा फायदा उठवत, आधुनिक मोबाईल तंत्राचा वापर करून, नोकरदार वर्गातील काही शिक्षक, कंडक्टर, शासकीय कर्मचारी, वकील यांना मटका खेळण्यासाठी पगाराच्या मापात क्रेडिट देऊन, १०० हुन अधिक रायटरांच्या माध्यमांतून आपली पाळंमुळं शहरात खोलवर काचा, पत्रा, कचरा वेचणाऱ्या महिला ते शेतात व सेन्ट्रीगवर कामं करणाऱ्या कामगारांपर्यंत पोचवली आहेत.
एक हजाराच्या डीपी पत्याला तीन लाखाचे पेमेंट..!
डीपी पत्ता प्रमाणे कल्याण, मुंबई, संगम, ओपन, क्लोज अशा प्रकारचे वेगवेगळे खेळ यात खेळले जातात. व्हाट्सअप वर सामाजिक माध्यमांतून आकडे व पैसे जमा करणारे राईटर ही रक्कम मटका चालकांपर्यंत पोहचवतात. त्यातून १० टक्के रक्कम रायटरची असते. एखाद्याचा मटका लागला. तर, ती रक्कम देण्याची जबाबदारी चालकाची असते. कारवाई झालीच.! तर, प्रक्रियेतुन मालक रायटरला सोडतो. हप्ता ही मालकच देतो. त्यामुळे यात रायटरांची मोठी चंगळ आहे. परिणामी अनेक जन रायटर्स होऊन, या धंद्याला बळकटी देत आहेत. गाव बंद असो किंवा आपत्ती असो, सरकारी सुट्टीच्या दिवशी तर, या धंद्याला तेजीच असते.
श्रीगोंदा शहरामध्ये वाढलेल्या या मटक्याच्या विष वेलीला छाटण्यास पोलीस प्रशासन असमर्थता का दाखवत आहे.?
काहींच्या म्हणण्यानुसार मटक्यातून होणाऱ्या कोट्यवधींच्या उलाढाली मागे पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी सामाविष्ट आहेत. त्यांच्या हप्ते खोरीमुळे कर्तव्यदक्ष आणि सामान्यांचे रक्षण करणारे पोलीस प्रशासन मात्र, श्रीगोंदयात बदनाम होत चालले आहे. त्याच बरोबर नगरसेवका सारखे पदाधिकारी जर मटका उद्योगात उतरले असतील आणि या गैर धंद्याला वाढवण्यासाठी शेकडोंनी रायटर्स शहरातच तैनात असतील. तर, तालुक्याची आकडेवारी किती..?
उदरनिर्वाहासाठी झगडणाऱ्या साधारण व्यक्तीपासून सक्षम नोकरी प्राप्त असलेल्या नोकरदारापर्यंत रुजलेल्या या उद्योगाच्या कुजलेल्या मानसिकतेचा पंचनामा करणार तरी कोण.? असा सवाल आता सामान्य श्रीगोंदा वाशीयांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे. One crore daily table of pots in Shrigonda city ..? More than 100 writers .. including grandparents and former corporators in the driver ..? How much is the installment to the police ..?
स्त्रोत:(मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार)
प्रतिकात्मक फोटोचा वापर.

