गोळीबार प्रकरणी आरोपीला श्रीगोंदा न्यायालयात शिक्षा..

दिनांक १ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:

कर्जत तालुक्यातील मुरकुटे वस्ती येथील विनोद मोहन मुरकुटे (वय ३३) याला गोळीबार करून एका तरुणाला जखमी केल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. पी. शिंगाडे साहेब यांनी आरोपीला एकूण ६ वर्षे कारावास आणि १०,०००/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

  • भा. द. वि. कलम ३२४ अन्वये: ३ वर्षे कारावास व ५,०००/- दंड.
  • भारतीय शस्त्र अधिनियम कलम २७ (१) अन्वये: ३ वर्षे कारावास व ५,०००/- दंड.
    • दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.

      दिनांक ०४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता कर्जत येथील प्रमोद विजय आतार (वय १९) हे आपल्या शेतात उसाचे वाढे गोळा करत असताना, शेजारी असलेल्या आरोपी विनोद मोहन मुरकुटे याने अचानक त्याच्या हातातील पिस्तुलाने फिर्यादीच्या डाव्या पायावर गोळी झाडली.
  • यात प्रमोद आतार जखमी होऊन खाली पडले. या घटनेनंतर आरोपी पळून गेला. जखमीला तातडीने कर्जत पोलीस ठाण्यात, उपजिल्हा रुग्णालय कर्जत आणि नंतर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. जखमीच्या जबाबावरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • कर्जत पोलीस उपनिरीक्षक श्री अमरजित मोरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, पंच, ससून रुग्णालयातील डॉक्टर (डॉ. रियाज पिंजारी, डॉ. हरिश ताटीया), आणि कलिना मुंबई येथील सहायक वैज्ञानिक विश्लेषक (महेश कदम) यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
    • सरकारी पक्षाचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील सौ. पुष्पा कापसे (गायके) यांनी पाहिले. त्यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि सादर केलेला भक्कम पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विनोद मोहन मुरकुटे यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी खटल्याच्या कामात सहकार्य केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading