दिनांक ३० सप्टेंबर २०२५, अहिल्यानगर:
दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “Youth Engagement and Water Stewardship” (YEWS) २०२३-२०२५ या उपक्रमांतर्गत जागतिक जल दिन (२२ मार्च) निमित जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रीन क्लब प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणून सर्वोत्तम पोस्टरसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वनशिव वैभव सतीश या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सदर पुरस्कार वितरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळानकर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.

२०२३-२४ मध्ये महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या ग्रीन क्लबची स्थापना करण्यात आली. या ग्रीन क्लब अंतर्गत विद्यार्थ्यांनी पाणी बचत आणि पाण्याचे संवर्धन यासंबंधी विविध उपक्रम राबविले.
जागतिक जल दिनानिमित्त (२२ मार्च) विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार करणे आणि लहान व्हिडिओ तयार करणे यासारखे उपक्रम आयोजित केले. २० पोस्टर्सपैकी सर्वोत्तम ३ पोस्टर्स निवडले गेले आणि राज्य स्तरीय स्पर्धेसाठी पाठवले गेले.

या ३ पोस्टरपैकी ‘वनशिव वैभव’ चे पोस्टर अहिल्यानगर जिल्हा स्तरावरील सर्वोत्कृष्ट पोस्टरसाठी निवडले गेले. या पोस्टरमध्ये शहर आणि गावातील लोक वापरत असलेल्या पाण्याची तुलना दाखवण्यात आली आहे.

शहरात बरेच लोक दाढी करताना, दात घासताना आणि आंघोळी करताना पाणी वाया घालवतात तर गावातील लोक आणि शेतकरी पाण्याच्या टंचाईने त्रस्त आहेत. या कारणांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात ‘वनशिव वैभव’ या जल बचतीवरील पोस्टरला पहिला पुरस्कार मिळाला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे व सर्व विश्वस्त यांनी वैभवचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम सोहळ्यास संस्थेचे विश्वस्त सुभाष काका शिंदे, भाऊसाहेब नेटके, संदीप औटी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, प्रा. डॉ. योगेश अहिरे व डॉ.महेश गिरमकर उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
