येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांची मोठी कारवाई..

दिनांक ९ फेब्रुवारी २०२५,तिसगाव, ता. पाथर्डी:

येथे अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सदर प्रकरणात आठ आरोपीं विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोमांस व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार पोनि. दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक तयार करण्यात आले. या पथकात सपोनि. हेमंत थोरात तसेच पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, हृदय घोडके, सुरेश माळी, संतोष लोढे, संदीप दरंदले, मयुर गायकवाड, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे आणि महादेव भांड यांचा समावेश होता.

दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तिसगाव येथील रविवार पेठ भागातील एका घरात गोवंश जनावरांची कत्तल सुरू आहे. या माहितीच्या आधारे पंचासमक्ष तपासणी केली असता सद्दाम हारूण शेख यांच्या घराबाहेर दोन वासरे बांधलेली आढळली. घरात काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना सापडले. पोलिसांनी तात्काळ या इसमांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. सद्दाम हारूण शेख (28 वर्षे, तिसगाव)
  2. इरफान गफुर शेख (32 वर्षे, तिसगाव)
  3. रिजवान मोहमंद शेख (37 वर्षे, भिंगार)
  4. आसिफ याकुब सय्यद (40 वर्षे, भिंगार)
  5. वसीम मोहमंद कुरेशी (32 वर्षे, भिंगार)
  6. आदिल अमिन कुरेशी (21 वर्षे, भिंगार)
  7. जावेद हारूण शेख (27 वर्षे, तिसगाव)
    फरार आरोपीचे नाव इरफान फौजमोहमंद कुरेशी (रविवार पेठ, तिसगाव) असे सांगण्यात आले आहे.

घटनास्थळी पंचासमक्ष तपासणी केली असता ३०० किलो गोमांस (६०,००० रुपये), दोन वासरे (१०,००० रुपये), आणि ५ लोखंडी सुरे असा एकूण ७०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाथर्डी पोलीस स्टेशन येथे बीएनएस २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading