गार येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न… बुधराणी हॉस्पिटल व ग्रामपंचायत गारच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यसेवेचा उपक्रम..

दिनांक ९ फेब्रुवारी २०२५,गार:

पुणे येथील सुप्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल व ग्रामपंचायत गार (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शिबिरात एकूण ३० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच जणांना मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यांच्यावर पुण्यातील बुधराणी हॉस्पिटल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच पाच नागरिकांना सवलतीच्या दरात चष्मे देण्यात आले.

बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने श्री. दिंगाबर आप्पासाहेब काळे व श्री. दिपक नार्वे या स्वयंसेवकांनी नेत्र तपासणी करून नागरिकांना नेत्र आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. बुधराणी हॉस्पिटल सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांद्वारे समाजातील गरजूंना मदत करत असल्याचे सांगण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल गार सोसायटीचे चेअरमन जितुशेठ मगर, सरपंच मिनाक्षीताई संजय मगर, माजी सरपंच सोपानकाका शेळके, ग्रामविकास अधिकारी शुभांगी शिंदे मॅडम, संचालक सोमनाथ जाधव, जालिंदर मगर, गणेश मचाले, रमेश सुपेकर, सुभाष परदेशी, सुभाष खोमणे, दादा भंडलकर, भरत शेळके, देविदास भंडलकर, गोरख परदेशी यांनी धन्यवाद व्यक्त केला व नागरिकांनी अशा सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी मुख्याध्यापक त्रिभुवन सर, ग्रामपंचायत कर्मचारी मोहन तावरे, अक्षय खोमणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे नागरिकांमध्ये नेत्र आरोग्याविषयी जागृती होत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading