श्रीगोंदा येथे शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न.. समाजातील वंचित घटकांच्या विकासातूनच प्रगतशील राष्ट्र निर्माण होईल – न्यायमूर्ती विभा कंकणवाडी

दिनांक ९ फेब्रुवारी ३०२५, श्रीगोंदा (अहिल्यानगर):

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या पालक न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी शासनाच्या योजनांची माहिती व लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या गरजेवर भर दिला. न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेचा विस्तार महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, भाग्यश्री पाटील यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या ४८ स्टॉलच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभांचे वितरण करण्यात आले.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading